गोव्याची मराठी
निवडणूका जवळ येऊ लागतात आणि जुन्या वादांना पेव फुटतो, दबाव तंत्रेविकसित होऊ लागतात. बऱ्याचवेळा दबाव आणणा-यांना त्यावर कसलाहीउपाय नकोच असतो, कारण ह्याच मुद्द्यांवर त्यांचे अस्तित्व जीवंत असते . मेलेल्या मुद्द्यांच्या मढ्यांवरची ही म्हातारी गिधाडे परत जागी होतात. भाषावादाची मढी उकरुन, ते शिल्लक राहिलेलं आणि कुजलेलं मांस खायचीसंधी ते सोडत नाहीत.
आपल्या सध्याच्या राजभाषा मागणीचेही तसेच काहीसे आहे. मराठी राजभाषा मागणी करणाऱ्यांचे ३ प्रकार आहेत. एक, ज्यांना कोकणी आणि मराठीला समान राजभाषेचा दर्जा हवा. दुसरे, ज्यांना फक्त मराठीलाच राजभाषेचा दर्जा देण्यात यावा. (त्यांच्या मते कोंकणी ही मराठीची फक्त एक बोली आहे ) आणि तिसरे हुशार आहेत; त्यांना असल्या वादातून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असते तसेच, सरकारी अर्थसहाय्यित अकादमीवर व इतर संगठनांवर महत्वाची पदे मिळवायची असतात.
आम्ही लोकशाहीत आहोत; सगळ्यांना हवे ते आपले विचार बाळगायचे संविधान मोकळीक देते. म्हणून ज्यांना जे बरे व खरे वाटते ते त्यांनी मान्यकरून घ्यावे.
हल्लीच परत सुरु झालेल्या मराठी राजभाषा मागणीने परत एकदा हा विषयढवळून निघाला. परत भाषेवरून गट निर्माण झाले. एकमेकांशी चांगलेबोलणारे गोंयकार अचानक दोन बाजूंनी विभागले जाऊ लागले. त्यात भाषेवरून विभागणी, जातीवरून विभागणी, धर्मावरून विभागणी, लिपीवरून विभागणी आणि गोमंतकीय आणि बिगर गोमंतकीय असे वर्ग सध्या समाजमाध्यमांवर दिसत आहेत. काही ठिकाणी तर अक्षरशः शिवीगाळ सुरु आहे. एकमेकांच्या आईबापावर विषय पोचले आहेत.
पण हे सगळे कशासाठी? तर भाषेसाठी. कुठल्याही भाषेचा मूळ उद्देश काय? भाषेसाठी आंदोलन म्हणजे नेमके काय? तर राजभाषेचा दर्जा… तो का? त्यात काय साध्य होणार आहे? ज्यांना दर्जा मिळाला त्यांनी तरी कसले झेंडे गाडले? आंदोलने करणाऱ्यांची पुढची पिढी इंग्रजीच्या मागे का पळतेय ? असे मूलभूत प्रश्न विचारले तर बऱ्याच जणांना उत्तरे देता येणार नाहीत.
मानवी उत्क्रांतीत भाषेचे खूप महत्वाचे योगदान आहे. आवाज हा निसर्गनिर्मित आहे तर भाषा ही कृत्रिम व मानवनिर्मित आहे. समाजरचनेत, मानवाच्याप्रगतीत भाषेचे खूप महत्वाचे योगदान आहे. त्यात संवाद साधणे, माणुसकीच्या भावनेतून समाजाला जोडून भावनांचे आदानप्रदान करणे, ते ज्ञानसंवर्धन करून त्याचा संपूर्ण मानवतेसाठी आणि वैश्विक कल्याणासाठी उपयोग करणे असे भाषेचे मूलभूत उपयोग असतात. भौगोलिक दृष्ट्या आवाजाच्या स्वरतंत्राची रचना बदलते आणि त्याचा परिणाम आम्ही बोलतो त्या भाषेवर होतो. त्यात मुख्यभाषा आणि बोलीभाषा बदलताना आपल्याला दिसतात. याच संकल्पनेतून आपली भाषावार प्रांतरचना जन्माला आली. मोठेप्रांत ज्यांची एक वेगळी भाषा आहे त्याप्रमाणे आपली राज्ये निर्माण झाली. किंवा त्या भाषेच्या जवळपास समानप्रकारच्या बोली भाषा आहेत त्यांना त्यामोठ्या प्रदेशात सामील करून घेण्यात आले. ज्या देशात ३० किमी वरभाषेची उच्चारपद्धती बदलते तिथे हे करणे तसे कठीणच काम होते. त्या त्याप्रांतातल्या उच्चवर्णीयांनी आपली भाषा बोली प्रमाणभाषा म्हणून घोषितकेली. दुसरा घोळ झाला तो म्हणजे, जे छोटे प्रांत होते, ज्यांचे एक वेगळेभाषिक अस्तित्व होते ते प्रांत आपल्या राज्यात आणायचा संघर्ष सुरु झाला. सीमांवरून वाद सुरु झाले.
आपली राज्याची भाषा कुठली हे जरी प्रांत ठरवत असला तरी भारतात कोणी कुठंही जाऊन आपली मातृभाषा अमुक म्हणून सांगू शकतो, बोलूशकतो. माझ्या मते तरी सध्याचे भाषिक अस्तित्व व त्यातल्या व्यवहाराच्यामागे नेहमी अर्थकारण व राजकारण असते. मौलिक आणि सांस्कृतिक गोष्टीत नंतर येतात. भाषेचा मुद्दा हा कधीच उजवा-डावा , काळा -पांढरानसतॊ त्याचे बरेच पैलू असतात, आर्थिक कारणे असतात. आमच्या गोव्याच्या भाषावादामागेही अशी बरीच सूत्रे आहेत. राजकारण आहे, अर्थकारण आहे. गोवा हे बहुतांश वेळा मांडलिक पद्धतीचे राज्य होते. ज्या-ज्या राज्याचे शासन त्या-त्या राजवटीच्या भाषेचा प्रभाव इथल्या प्रांतीयभाषेवर झाला. त्यामुळे कोंकणीला ७१ व्या घटना दुरुस्तीद्वारे ८व्याअनुसूचीमध्ये (परिशिष्टात) अधिकृतरित्या समाविष्ट करण्यात येईपर्यंत इथेराजकीय दृष्टया वेगळी अशी एक भाषा निर्माण होऊ शकली नाही.
ऐतिहासिक दृष्ट्या कोंकणीचे लिखित व साहित्यक पुरावे जास्त उपलब्ध नाहीत. पण लोककलांमधून मौखिक पुरावे बरेच मिळतात. म्हणजेच ह्याप्रांतात एक वेगळ्या भाषेचे अस्तित्व होते हे आपण नाकारू शकत नाही. वसाहतवादी राज्यकर्त्यांमुळे काही लिखित पुरावे मिळतात; त्यात रोमी लिपीचा वापर केलेले बऱ्यापैकी कोंकणी साहित्य मिळते. आता रोमिंवाल्याना सोयीस्करपणे डावलण्यात आले हा भाग वेगळा. पण याचा अर्थ इथे मराठीचे अस्तित्व नव्हते असेही नाही. त्याकाळी कोंकणीच्या मानाने मराठी ही खूप समृद्ध आणि विकसित भाषा होती. मराठीचा पोर्तुगीज राजवटीतील सरकारी कामकाजात वापर व्हायचा. जी भाषा शिकून सरकारी फायदे आणि नोकऱ्या मिळतात ती भाषा शिकण्याचा हुशार माणसांचा कल असतो. जुन्याकाळीही असेच झाले. गोव्यातील जे उच्चवर्णीय, जे दुभाषी ववकिली करत होते त्यांनी जी प्रस्थापित भाषा आहे त्यात व्यवहार केला. आता कसे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या समोर आपण उगाच दबले जातो तसेच, त्या काळातला सामान्य कोंकणी बोलणारा गोंयकार या उच्चशिक्षित उच्चवर्णीय मराठी बोलणाऱ्या व शिकलेल्यांसमोर दबला गेला. मग त्याचभाषेत शिक्षण, आरत्या, भजने, वृत्तपत्रे, साहित्य हे सगळे केल्याने सरकार दरबारी मान्यता म्हणून मग तीच भाषा शिकण्याकडे कल होता. पोर्तुगीजभाषा शिकणा-या गोंयकारांच्या मानसिकतेत हेच अर्थकारण असणार. पण भौगोलिक दृष्ट्या अगदी जवळची असल्याने मराठी आमची झाली तशी पोर्तुगीज आमची होऊ शकली नाही. गोवा मुक्ती नंतरही जनमानसात वाचण्या लिहिण्याची भाषा म्हणून मराठी उच्च स्थानावर राहिली. पण तुलनात्मक दर्जा बघितला तर भाषा म्हणून महाराष्ट्राच्या तुलनेत ती विकसित होऊ शकली नाही. उदा. गोव्याच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये गोमंतकीय मराठी साहित्यकांचं स्थान नगण्य राहील.
आता कसा पर्यटन व्यवसायात परप्रांतीयांचा भरणा दिसून येतो. कारण संधी आहेत आणि अर्थकारण आहे. तसेच जुन्या काळात गोव्यातही झाले असणार. पोर्तुगीज काळात दुभाषी, वकील, लेखक, स्वातंत्रानंतर मराठी शाळातले मास्तर, बँकांचे अधिकारी, शिकेलेले सरकारी अधिकारी, मराठी वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, बहुतांश महाराष्ट्रातून आलेले. या दरम्यान, मराठीचा बराच बोलबाला होता. स्पर्धा वाढल्यामुळे इथले उच्चवर्णीय जे एकेकाळी मराठीचा आधार घ्यायचे त्यांना हे हळूहळू जड व्हायला लागले. मग एक नवीन मार्ग होता तो म्हणजे इथल्या स्थानिक प्रांतीय भाषेला स्वतःचे अस्तित्व आणि राजाश्रय मिळवून ह्या 'भायल्याना' अल्पसंख्यांक करायचे. एक वेगळ्या भाषेच्या आधारे नवीन राज्याची नीव ठेवायची. इथेच एक कोंकणी शब्द जन्माला येतो “अस्मिताय”
आमची कोंकणी
आमचो एक शेजारी आसलो. तो गोंय स्वातंत्र्या उपरांत महाराष्ट्रातल्यान हांगा शिक्षक म्हणून येयल्लो. तो म्हाका सदाच सांगी की “बामण व किरिस्तांव लोकांनी गोव्याची वाट लावली. नाही तर तुम्ही आज महाराष्ट्रात असता. तिथे तुम्हाला मोठ्या संधी असत्या.” व्हड जाता तशें समजलें की विलनीकरण आणि भाषावादाचे खूप खोल नातें आसा. गोंयांत चड मराठी बरोवपी/उलोवपी लोक आसात अशें दिसत तर तें महाराष्ट्रांत विलीन करपाक सहज जाताले. पूण तशें जालें ना. चडश्या गोंयकारांनी वेगळे रावपाचो निर्णय घेतलो आनी तेंका गावलो कोंकणीचो तेंको. जनमत चांचणी जाल्या उपरांत महाराष्ट्रा खातीर हो विषय थंयच सोंपलो. पूण जेंका हीं व्हड सपना दाखोवन झुजपाक लायिल्ले ते शेणले. तेंका भावनिक पातळेर ह्या झुजांत ओडून हाडलेले, ते बाबडे अजून थंयच अडकून आसात. आतां ते म्हण्टात की ‘कोंकणी खतरे में है।’ कोंकणीक वांचयतलो जाल्यार मराठीक राजभास करात. प्रस्न साधो आनी सरळ विचार करपाचो आसा. मात्सो भावनेचो पडदो कडेक करून पळयल्यार सगळें निवळ दिसूंक लागतलें.
आमी कितलेय इंग्लिश शिकले तरी आमी खरे इंग्लिश लोकां मुखार कमीच. तशेंच आमी कितलीय बरी मराठी शिकले तरी महाराष्ट्रांतल्यान आयिल्ल्या मराठी मनशां मुखार स्वताक कमीच लेखीत आयले. हाचो प्रभाव इतको आसा की आमच्या कांय लोकनाट्यांमदीं देव मराठी उलयता आणि राक्षस कोंकणी. आमची तोडकी मोडकी आणि इतिहासिक नाटकांत बी उलयता तसली मराठी आयकून हे मराठी लोक आमची फकाणा करतात. कांय जाण सामके जीवाचो आकांत करून प्रमाण मराठी उलोवपाचो प्रयत्न करतात. पूण निमाणे तेंच्या खातीर तुमी भायलेच. कांय मराठी, कलाकार, लेखक आनी विचारवंत ह्या मातयेंत जन्माक आयले. पूण ते व्हड जाले महाराष्ट्रांत वचून. राष्ट्रीय पांवडया वयलो एकूय साहित्य पुरस्कार आमचे गोंयचे मराठीक मेळूंक शकलो ना, आनी त्या दर्जाचें साहित्य आमी तयार केलें तरी महाराष्ट्रांतले साहित्यिक आमकां तें मेळुंक दितले कांय ना तेंवूय खबर ना. तंजावूर सारख्या प्रांतांतली मराठी एक वेगळें अस्तित्व घेवन आसा. तशें गोंयातली मराठी ही वेगळी आसा अशें कांय गोंयचे मराठी जाणकार सांगतात. ती कशी तें मात ते प्रमाणित करूक शकलेनात. तांणी ती बेगीन करची. मागीर लोक तेंका तेंको दीतले. मागीर अशे कांय भाड्याचे मनीस हाडून (प्रसार माध्यमातल्यो कांय मुलाखती पळोवन निष्कर्ष) रस्त्यार देवचें पडचें ना.
ह्या गोंय प्रांतांतल्यान मराठी शिकून, तातूंत बरयिल्ल्या साहित्याचो एक मराठी बुदवंतान अपमान केलो आणि तातूंतल्यान हे व्हड चळवळीचो जन्म जालो. आसलेल्याच अस्तित्वाक प्रमाण मेळोवपाक एक धडपड सुरु जाली आणि व्हड प्रयत्नांनी आमची प्रांतीय अस्तित्व जपपाक कोंकणी राजभाषा म्हणून जन्माक येयली. जनमत चाचणेंतल्यान जर आमी वेगळें अस्तित्व जपूंक नासलें तर आज आमी महाराष्ट्रांत एक ल्हान तालुको म्हूण आसपाचे. गोंयचे हे अस्तित्व कोंकणीन जपलें. हो आमचो इतिहास. उपरांत देवनागरी कोंकणी ही राजभास आणि मराठी सहभाषा म्हणून वापर जावं येता अशें सगळे जालें. हातून एक वेगळो प्रवाह आसलो. तो म्हळ्यार रोमी लिपीन बरोवपी कोंकणी वाल्यांचो. गोंयच्या किरिस्तांवांचे कोंकणीतली ती बोली जी रोमी लिपीन बरयतात. रोमन लिपी स्थानिक न्हय म्हणून कोंकणी आंदोलनान सक्रीय वांटो आसूनय किरिस्तावांक सोपी जाता तशी भास गावलीच ना. निमाणी देवनागरी कोंकणी तेंच्या माथ्यार मारली. जी तेंका मराठी इतकीच कठीण आनी परकी दिसता. मराठीवाल्यानी ह्या रोमीवाल्यांक धरून एक तिसरी आघाडी उघडपाचो प्रयत्न केलो पूण ते यशस्वी जाले नात. देवनागरी कोंकणी परवडली पूण तुमी नाका अशी भूमिका घेवन रोमीवाले शांतपणान आपलें काम करीत आसात.
पूण एक मात खरे, इतकें आसूनय मराठीचो व्हड प्रभाव गोंयांत आसा. सगळी चडशीं व्हडली वृत्तपत्रां मराठींत. अजून आरती, भजना, गावांतली नाटकां मराठींत, हें कोंकणीवादीय न्हयकारुंक शकनात.
मराठीक गोंयांत कोणे आडोवंक ना. रोमी बोरोवपाक कोण आडमेळी करीना. इतिहासांत खोलायेन वचत तर खूप कितें आसा. ते सोदप भाशा संशोधकांचें काम. सध्या गोंकारांच्या फुडाराक कितें बरे इतकेंच आमी समजूंक जाय. राजकीय अस्तित्वाखातीर प्रांतरचने प्रमाण एक कोंकणी राज्यभास आसा ती पुरो. पूण बरे विचार आनी साहित्य तयार जाता तर खंयच्याय भाषेक वा लिपिक तेंको दिल्यार कितें वायट? हो विचार करून सरकारी पांवड्यार लेगीत बरें साहित्य तयार जावचें म्हूण दोनूय भाषांक अणि लिपिंक आर्थिक तेंको आसा. मागीर अडटा खंय? बरें साहित्य तयार करात, बरे लेखक, कवी, विचारवंत तयार करात. भास समृद्ध करपाचें तेंच खरें काम. पूण ना …आमी तें सोडून सगळें करतात.. हाचो परिणाम म्हळ्यार साहित्य संमेलनाक आणि भाषांच्या कार्यावळींक शाळांनी नोटीस काडून शिक्षक आणि विद्यार्थ्यांक हाडून हॉलां भरचीं पडटात. ल्हान भुरगीं हालीं इंग्लिशेंतल्यान शब्द विचारून तेजो कोकणी अर्थ विचारतात/सांगतात. तुमकां हेच जाय आशिल्लें? कोंकणी तशेंच मराठी दोनूय भाषे कडेन युवा पिढी दुर्लक्ष करून पयस वचूंगक लागल्या. हें गोंयांतच जायना तर सध्या महाराष्ट्रांत लेगीत हेंच चित्र दिश्टी पडटा. इतको राजकीय तेंको मेळून हें अशें कित्याक जाता हो प्रश्न उप्रासता. फाल्यां मराठीक वा कन्नड भाषेक जरी राजभास केली तरी हो प्रश्न सुटचो ना. कांय वर्सांनी चवथीक आरतीचीं पुस्तकां इंग्लिशेन येवपाक लागतलीं आनी आमी राजभास आंदोलना आनीअकादमीचें राजकारण करत उरतले.
अवश्य मराठीचेर प्रेम करात, मराठी उलयात, बऱयात, व्हड जायात. पूण राज्यभाषा करपाचो हट्ट त्या प्रगती मार्गाचेर तुमका व्हरचो ना. हें अशेंच चलत रावलें तर, आमी ५० हजार मराठी प्रेमीक घेवन मोर्चा काडटले हे भपके आतां ५ हजारांचेर पावले आनी फुडाराक कांय दिसांनी ५०० जायत आनी घडये ५० ना तर ५ जायत. कारण तुमचे हे भावनेचे खेळ आयच्या तरणाटे पिळगेचें पोट भरुंक शकनात.
Myभास
As I said in the first Marathi part of this article, there are always economic reasons behind development and our relationship with a particular language. A big chunk of citizens is rapidly moving towards English in the pursuit of so-called development and economic growth. Rapid globalisation and liberal policies have exposed us to the world, and youngsters understand that English can take them to a global level.
Perhaps, in the future, regional languages will be remembered in much the same way as traditional costumes worn during festivals. The question, then, is whether this is right or wrong. Can we preserve our regional identity while embracing English? Yes, we can. In fact, I feel that is precisely what will happen in the future.
At the end of the day, it is about preserving knowledge and communicating with others. Whichever language remains open, adaptive and relevant will survive the race. Right now, we can see English doing exactly that.
Simply opposing English at the local level and making regional languages compulsory will not solve our problems. Suppose, in the future, China becomes a superpower and the Chinese language becomes a source of good earnings and economic development. People will naturally go after learning and adopting Chinese, while keeping their regional language perhaps only for name’s sake.
The same thing has happened before. Persian once dominated large parts of Asia as a language of power and culture before being replaced by English. Languages rise, expand and decline with changing centres of power, culture, knowledge and opportunity. It is ultimately about practicality and adaptability — and, quite simply, our sustenance.
People running this language agitation need to look at the ground reality. Why is the youth not taking an interest in your agitation? Because they see no point in it.
We have much bigger issues to deal with when it comes to protecting our regional identity. Look at how, during the last three days of the Assembly session, issues related to land and TCP were strategically sidelined. Look at how little our cabinet ministers seem to care about answering questions related to Goa or the Goan people. They don’t even feel that they should attend the session and address the people.
Then look at where the government’s attention is going — the religious conversion bill, used as a weapon to create fear among minorities and later withdrawn.
Meanwhile, we are witnessing the collapse of law and order, the rapid intrusion of non-Goans taking over our resources and, increasingly, our cultural identity. And seriously, you people think a Goenkar will ignore all these issues and focus on why Marathi is not made Rajyabhasha?
Come on... be reasonable.
As a common man, my main concern is not the official language. Employment issues, electricity bills, fuel prices and inflation are affecting me badly. If making an age-old issue mainstream can solve these problems for me, I am with you.
But as a Goenkar, my everyday reality is far more multilingual than this agitation would have us believe.
My typical day starts with speaking Konkani at home. Later, I call my Marathi friends and speak with them in Marathi. The day proceeds with work and business conducted in English. I am open and accessible to all three languages and the literature available in each. Sometimes Hindi also joins my day, giving me access to more of its writings, thoughts and ideas.
I cannot imagine being fanatical about only one language — conditioning and limiting myself to lesser knowledge simply because it comes wrapped in a different language.
People from Konkani, Marathi, and even Rumi Konkani did the same. They limited their scope of vision by refusing to adopt and accept knowledge from their counterparts.
So, a humble request to these language agitators: open your eyes and be reasonable.
The youth and the next generation are moving away from you. And perhaps that is the real danger you should be worried about.
Because in the future, English — or an AI-driven language — may strip away your authority over culture altogether. Our beautiful scripts may eventually vanish, not because people learned another language, but because of the stupid policies you chose to impose in the name of protecting your own.
Language survives when people find a reason to use it.
Give them that reason.



